Shriman Yogi

Shriman Yogi

श्रीमान योगी

This time let's talk about history, Maratha history to be specific. A brief on Shriman Yogi. (At the end this brief is explained in Marathi also.) It's quite a big novel. I have read it twice and since then it has been at the top of my favorites and I strongly recommend this. I'm not going to explain any part of the book even with the minor details, it will spoil that feeling you will get when you are going to read it.

About

Shriman Yogi is a biography of Chhatrapati Shivaji Maharaj by Ranjit Desai. Ranjit Desai was a brilliant Marathi author, awarded with Sahitya Academy Award in 1964 and Padma Shri in 1973. Known for his emotional writing throughout his work such as Swami, Radhey and Abhogi etc. But best known for his novels Swami and Shriman Yogi. Shriman Yogi describes the life of first Maratha King, Chhatrapati Shivaji Maharaj, who established a Maratha kingdom that never before existed.

Chhatrapati Shivaji Maharaj

Maharashtra has seen numerous saints, social reformers, and warriors, so many that counting them would take a lifetime. Among them stands a great leader who, with his feet firmly planted on the chest of the rugged valleys of Sahyadri, and his broad arms spread wide, boldly challenges Maharashtra’s destiny itself. His name—Chhatrapati Shivaji Maharaj—needs no introduction. Just the mention of his name fills every Marathi person with a sense of pride.

Since childhood, I have been reading voraciously—stories, books, texts, and novels—like an untamed animal with no particular direction or purpose. I read anything I could lay my hands on, in any manner I found it. Many books I don’t even remember reading, yet this habit became a part of me. Amid all this reading, one topic has always held a special place and continues to do so: the life and literature on Chhatrapati Shivaji Maharaj.

As a child, I read poet Paramanda’s work on Shivaji Maharaj, though I didn’t know who Paramanda was at the time. Yet, his words engraved themselves on my heart permanently. Since then, my fascination for Shivaji Maharaj has grown immensely. I have viewed Shivaji Maharaj through the perspectives of Shivshahir Babasaheb Purandare, Ninad Bedekar, and Ranjit Desai—all individuals with a deep admiration and obsession for the Maharaj.

There’s no dearth of literature on Shivaji Maharaj in Maharashtra, yet original Marathi writings on him are comparatively few. Here, a Marathi proverb aptly applies: "Our tradition is such that even if we make it the size of the sky, we should not write even a speck."

Describing Chhatrapati Shivaji Maharaj in words is a daunting task. His brilliance and aura are beyond words. He was a multifaceted personality—a visionary, an exemplary warrior, a master of warfare, and an extraordinary strategist. The qualities he embodied set him apart from any other leader in history. I am not a seasoned writer, but I enjoy writing about Shivaji Maharaj, though not on a grand scale but as best as I can manage.

Respect and pride for Maharaj run in the blood of every Marathi person. It’s almost unthinkable that someone born in Maharashtra would not feel reverence for him. His name has become synonymous with Maharashtra. Every mention of Maharashtra naturally includes his name because what Shivaji Maharaj built was for the welfare of society, for our culture, our gods, and ultimately for the nation. I love Babasaheb Purandare’s words, “Shivaji Maharaj is a ghost, but one with the strength of the five elements—a benevolent ghost.”

One thing that bothers me, however, is that over time, many myths have been spread about Maharaj—some by enemies, others by our own people. These myths are often mistaken for history and continue to spread. Myths tend to reach people faster than the real history because of their dramatic flair. Some of these tales suggest that Maharaj could turn invisible, fly, or even perform hypnosis. Such stories, born out of fear and political strategy, helped at the time but, when spread by our own people, tarnish his true image. Stories about the lizard climbing on the Kondhana fort, the Kalyan Subedar’s daughter-in-law, Maharaj’s dog Waghya, or the journey to Delhi in six hours—all these myths slightly alter the true history. These misconceptions need to be corrected.

Shivaji Maharaj should be understood not just as a historical figure but as a human being. This is not easy because following his principles, understanding Shiv Dharma, and incorporating it into our lives is more than just growing a beard or wearing earrings. It’s not about ridiculing people from other regions over language or causing chaos during Shivjayanti. Real Shiv Dharma is living and applying the thoughts and values Maharaj stood for.

Honoring his legacy and values means carrying forth his teachings in our lives. His work is immortal in history, but how we bring his values into our present matters more. Shiv Dharma is not just about shouting slogans in his name but accepting his ideology, using his thoughts as a guide, and making efforts to contribute to society with the same devotion. Everyone who truly loves Maharaj should learn from his life and sow the seeds of his values within themselves, for Maharaj was of his time, yet his teachings have an everlasting impact.

What I liked About this book

It is one of the best written books and the writing paints quite a picture in front of you as if you are witnessing those moments yourself. The dialogues and the details in some of the events are so well written that you get too overwhelmed. Events such as the battles to win forts, building them to make them more strong that you feel involved in them and there's the coronation (Rajya Abhishek) ceremony when Shivaji Maharaj became Chhatrapati, it gives you the involvement into them as if you are witnessing them in front of you.

There are some narratives in the book that when you see it, it feels unreal. Building a kingdom in a hostile era, creating a government from zero that works very efficiently, breaking the prejudices, at some point going against your own people for the good of kingdom and forming a whole new political and financial system that operates over a fairly large geographical area all this in a hostile and prejudicial time period is nearly impossible. When you get involved in reading while it's happening right there, it literally gives you goosebumps. At some points it gets too much emotional that you would have never expected. Because most of the people have seen Chhatrapati only as a King not as a father, a son, a husband and a disciple.

Best thing about this is that it shows Shivaji Maharaj as he was, with no exaggeration. It also shows the society, governance and the overall environment at that period. The author has written this book with the basis of facts and along with the sequence with the historians findings. You can also see the references that the author used at the end of the book.

These are the links where you can buy Shriman Yogi in English and in Marathi. I personally feel that this is a book that everyone should read at least once.

Marathi Brief

श्रीमान योगी

श्रीमान योगी ही छत्रपति शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वर्णन करणारी रणजीत देसाई यांची कादंबरी. रणजीत देसाई, एक अतिशय उत्कृष्ट मराठी लेखक होते ज्यांना १९६४ साली साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९७३ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. देसाई त्यांच्या भावनिक लेखणासाठी ओळखले जातात. स्वामी, राधेय आणि अभोगी ह्या त्यांच्या काही नावाजलेल्या साहित्य रचना.

हा लेख शिवाजी महाराजांविषयी नसून त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कादंबरीचा परिचय आहे. श्रीमान योगी म्हणजे चोहो बाजूंनी शत्रू राज्यांनी वेढलेल्या काळी एक स्वप्नवत कल्पना वाटावी अशा मराठी साम्राज्याची स्थापना आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ ते देहावसाना पर्यंतचा छत्रपतींचा प्रवास.

छत्रपति शिवाजी महाराज

महाराष्ट्रात आत्तापर्यंत तमाम संत, समाजसुधारक आणि लढवय्ये होऊन गेले. गणती करायला हयात जाईल. पण ह्या गणतीमध्ये एक महापुरुष दऱ्याखोऱ्यांच्या छाताडावर पाय रोऊन आणि आपले विशाल बाहू पसरून साक्षात महाराष्ट्राच्या नियतीला आव्हान देतो. अगदी डोळे दिपवणारं चरित्र. नाव काय कुणाला नवीन नाही. जे नाव घेताना प्रत्येकाला आपण मराठी असल्याचं सार्थक आणि गर्व वाटावा, छत्रपती शिवाजी महाराज.

मी लहानपणापासून झपाटल्यासारखं वाचत आलोय. लघुकथा, पुस्तकं, ग्रंथ, कादंबऱ्या. एखादया नाठाळ जनावरं सारखं. ना त्याला काही दिशा असते ना काही उद्देश्य. जे भेटेल ते, जसं भेटेल तसं आणि जिथं भेटेल तिथं वाचावं. काही साहित्य तर असं आहे की मला ते मी वाचलंय हेही आठवत नाही. काही वर्ष विसर पडला खरा पण आवडीला आणि सवयीला काही पर्याय नसतो. ह्या सगळ्या वाचनात मोठा भाग होता आणि अजूनही आहे तो म्हणजे शिवसहित्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा.

लहानपणी मी छत्रपतींवर असलेला कवी परमानंदांचा ग्रंथ वाचला. तेव्हा मला परमानंद कोण हे माहिती नव्हतं, पण ते लिखाण माझ्या काळजावर कायमचं असं कोरलं गेलंय की ते मिटता मिटणार नाही. तेव्हापासून मला छत्रपतीं विषयी एक वेगळीच आवड आणि औत्सुक्य आहे. मी छत्रपतींना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, आणि रणजित देसाई यांच्या दृष्टिकोनातून पाहिलंय. महाराजांचं अक्षरशः वेड असणारी ही सगळी व्यक्तिमत्त्वं.

शिवाजी महाराजांचा जीवन परिचय देणाऱ्या साहित्याची कमतरता आपल्याकडं अजिबात नाही, परंतु त्यातही असणारं मूळ मराठी लिखाण म्हणा किंवा नोंदी ह्या तुलनेने कमीच आहेत. यासाठी एक ओवी पुरेपूर लागू पडते, "आमुची तो रीत ऐसी, की गगणाएवढे केले तरी तिळाएवढेही न लिहावे."

खरं तर छत्रपतींना शब्दांच्या चौकटीमध्ये बसवायचं म्हणजे महाकठीण कर्म. अलौकिक प्रतिभा, तो जो aura आहे तो अवर्णनीय आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, व्यावहारिक द्रष्टा, उत्कृष्ट योद्धा, युद्धतज्ञ आणि अष्टावधानी युगपुरुष. महाराजांच्या ठायी असलेले सगळे गुण त्यांना जगाच्या इतिहासातील इतर कोणत्याही सत्ताधीशापेक्षा उजवे ठरवतात. मी काही मुरलेला लेखक नव्हे पण मला महाराजांवर लिहायला आवडतं. खूप मोठ्या प्रमाणावर नाही म्हणा पण माझ्या क्षमतेनुसार.

महाराजांविषयी आदर आणि अभिमान प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तातच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपतींचा आदर तुमच्या रक्तात नसेल तर त्या व्यक्तीनं स्वतःला अमराठी म्हणवून घ्यावं. कुणी एखादी व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राचं नावं घेते तेव्हा अनावधानाने छत्रपतींचं नावही त्या सोबत येतं आणि ते आलंही पाहिजे कारण महाराजांनी जे काही निर्माण केलं, ते आपल्या समाजासाठी होतं. आपल्या संस्कृतीसाठी, देव देवतांसाठी आणि पूर्णपणे राष्ट्रासाठी होतं. मला बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य विलक्षण आवडतं, "शिवाजी महाराज हे एक भूत आहेत पण ते पंचमहाभूतांची ताकत असलेलं भूत आहे, ते एक कल्याणकारी भूत आहे."

एक गोष्ट मात्र मनाला लागून जाते की महाराजांविषयी अनेक दंतकथा पसरवल्या गेल्या आहेत मग त्या शत्रूकडून असो किंवा आपल्याच लोकांकडून. त्या कथा लोकं मूळ इतिहास समजुन मान्य करत आहेत आणि पसरवतही आहेत. दंतकथा ह्या मूळ इतिहासापेक्षा जास्त लवकर पसरतात आणि लोकांना खऱ्याही वाटतात कारण त्यात एक प्रकारचं लालित्य, नाट्यमय वळण असतं. अशा काही अफवा आहेत जसं की महाराजांना अदृश्य होता येतं, उडता येतं किंवा वशीकरणही ते जाणतात. आता ह्या अफवा महाराजांच्या भितीपोटी जन्माला आल्या, राजकीय दृष्ट्या त्या फायद्याच्याही होत्या, परंतु याउलट ज्या आपल्याच लोकांकडून जन्माला आल्या त्यामुळं महाराजांच्या प्रतिमेला एक प्रकारचा धक्का बसतो. यशवंती घोरपड, कल्याणच्या सुभेदाराची सून, महाराजांचा वाघ्या श्वान, सहा तासांची दिल्लीपर्यंत घोडदौड किंवा साठ पासष्ट किलोंची एक तलवार वगैरे ह्या अशा गोष्टींमुळे महाराजांचा मूळ इतिहास थोडासा बदलला जातो. ह्या कुठेतरी थांबल्या हव्यात.

महाराज हे प्रत्येकाने जाणून घ्यावेत, फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणुन नव्हे तर एक माणूस म्हणुन, पण हे थोडं कठीणच म्हणावं लागेल कारण छत्रपती समजून घेणे, शिवधर्म अनुसरणे, अंगीकारणे म्हणजे काय तर फक्त दाढी बाळगणे, कानात बाळ्या घालून मिरवणे नव्हे (अर्थात हा वैयक्तीक प्रश्न). परप्रांतियांना भाषेवरून छळणे आणि शिवजयंतीला समाजात गोंधळ उठवणे हाही शिवधर्म नव्हे. थोडंसं अलंकारिक वाटेल पण शिवधर्म पाळणे म्हणजे छत्रपतींना समजावून घेऊन त्यांचे विचार आचरणात आणणे.

त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने जपणं म्हणजे आपल्यात त्यांच्या शिकवणीला साकार करणं. इतिहासात त्यांचं कार्य अमर आहे, परंतु आपण त्यांचे विचार वर्तमानात कसे घेऊन येतो, हे अधिक महत्त्वाचं आहे. शिवधर्म म्हणजे केवळ शिवरायांच्या नावाने घोषणा देणं नव्हे, तर त्यांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करणं, त्यांच्या विचारांनी मार्गदर्शन मिळवणं, आणि समाजाला त्याच निष्ठेने काहीतरी देण्याचा प्रयत्न करणं हेच खरं शिवधर्म आहे. छत्रपतींवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या जीवनातून शिकायला हवं आणि त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात पेरायला हवा, कारण महाराज एके काळचे होतेच; पण त्यांच्या शिकवणीमुळे त्यांचा प्रभाव भविष्यकाळातही कायम राहील, हेच खरे त्यांच्या कार्याचे यश होय.

पुस्तकाची वैशिष्ट्ये

हे पुस्तक छत्रपतींचे काही नावाजलेले पराक्रम त्याचबरोबर महाराजांचा उतरता काळ आणि क्वचित प्रसंगी त्यांचा भावनीक हतबलपणा यांचा संग्रह आहे. शिवाजी महाराजांचं एक राजा ह्या पलीकडेही इतर कुणाही सारखा भावनाविवश माणूस हेच रेखाटन श्रीमान योगी ह्या पुस्तकाला इतर कोणत्याही शिवसाहित्यापेक्षा वेगळा दर्जा बहाल करतं. पुस्तकातील काही वर्णने ही तर त्याकाळी अशक्यप्राय वाटतात जसे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापना, शून्यातून प्रशासकीय यंत्रणा आणि लष्कर निर्मिती, वेळप्रसंगी राज्यासाठी आप्तस्वकीयांचा विरोध पत्करणे, सामाजिक पूर्वग्रह आणि काही प्रसंगी चुकीच्या धर्म धारणा यांना विरोध इत्यादी.

रणजीत देसाई यांचं तपशीलवार आणि उत्कृष्ट संवाद लेखण यामुळे पुस्तकाला एक वेगळाच जिवंतपणा येतो. कोणताही प्रसंग आपण तो स्वतः डोळ्यादेखत अनुभवत आहोत ही जाणीव वाचताना होत राहते. जसे गड सर करताणाच्या लढाया, किल्ल्यांची डागडुजी करतानाचे काही प्रसंग किंवा रायगडावर झालेला महाराजांचा औपचारिक राज्याभिषेक ह्या घटना वाचताना तर एक अत्यंत अभिमानी किंवा भावनिक लहर शरीरातून जाते. पुस्तकातील काही प्रसंग हे अतिशय अनपेक्षित वाटतात कारण बहुतेक लेखनात शिवाजी महाराज फक्त एक राजा ह्याच विचाराने चित्रित करण्यात आले आहेत ना की एक पिता, पुत्र, एक संसारिक पुरुष आणि एक धर्मप्रेमी आणि माझ्या मते हे सर्व पैलू श्रीमान योगी पुस्तकाला अत्यंत वेगळ्या प्रकारच्या शिवचरित्राचा दर्जा देतात.